पुणे : पुण्यातील एनआयबीएममध्ये आज सकाळी अचानक बिबट्यानं हजेरी लावली. घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी लगेच वनविभागाला याची माहिती दिली आणि सापळा रचून बिबट्याला पकडलं.
आज सकाळी पुण्यातील कोंढवा भागातील एनआयबीएम मध्ये हा बिबट्या घुसला. सकाळी शिपाई आणि त्याच्यासोबत आलेल्या विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचं कुलूप उघडलं. तेव्हा त्यांना आतमध्ये बिबट्या दिसला. तातडीनं त्यांनी वनविभागाला याची माहिती दिली.
वनविभागानं सापळा लावून बिबट्याला पकडलं. ग्रंथालयाचं पाठीमागचं दार रात्री उघडं राहिलं आणि तिथूनच बिबट्या आतमध्ये आला असा अंदाज बांधला जात आहे.