मुंबई : मुंबई पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वीकएंड आणि नाताळच्या सुट्टीमुळे एक्स्प्रेस वेवर वाहनांची संख्या वाढली आहे.


मुंबई पुणे महामार्गावरील सर्व टोल नाक्यांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे सुट्टीसाठी बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.

दुसरीकडे मुंबई-गोवा महामार्गावर सुकेळी खिंडीत टँकर बंद पडल्यानं वाहतूकीचा खोळंबा झाला आहे. कोकणात आणि गोव्यात नाताळसाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या पर्यटकांना वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे.

दरम्यान मुंबई-गोवा महामार्गाचं चौपदरीकरण असल्यानं फक्त दोनचं लेन सुरु आहेत. त्यामुळे महामार्गावर सध्या एकेरी वाहतूक सुरु आहे.