Maval Assembly Constituency : लोकसभेवळी खासदार विशाल पाटलांसाठी राबवण्यात आलेला सांगली पॅटर्नची राज्यभर चर्चा झाली. आता असाच पॅटर्न मावळ (Maval Pattern) विधानसभेत राबवला जातोय. या मतदारसंघात मावळ पॅटर्नची जोरदार चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने विद्यमान आमदार सुनील शेळकेंना (Sunil Shelke) उमेदवारी दिली आहे. त्यामुळं भाजपचे पदाधिकारी नारज झाले आहेत. सुनिल शेळकेंच्या पराभवासाठी बंडखोरी झाली आहे. बापू भेगडेंनी (Bapu Bhegade) तशी घोषणा देखील केली आहे. त्यानंतर काही वेळातच मावळ भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले अन बंडखोर बापू भेगडेंना पाठिंबा दर्शवलाय. राजीनामे देताना माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंना अश्रू अनावर झाले.
सुनिल शेळकेंचा पराभव करणे हेच आमचं लक्ष
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुनिल शेळकेंचा पराभव करणे हेच आमचं लक्ष असल्याचे बाळा भेगडे म्हणाले. मावळच्या जनतेच्या आशिर्वादावर बापू भेगडे यांना निवडूण आणणार असल्याचे बाळा भेगडे म्हणाले. योग्य वेळी योग्य प्रयोग करायचा असतो असे बाळा भेगडे म्हणाले. त्यामुळं मी यावेळी उभा राहणार नाही. आम्ही बापू भेगडे यांना पाठिंबा दिला आहे. मावळ विधानसभा मतदारसंघात भाजप टिकला पाहिजे हीच आमची भूमिका आहे. पाच वर्ष आम्ही खूप भोगलं आहे असे बाळा भेगडे म्हणाले. आज आमचं लक्ष बापू भेगडे यांना निवडून आणणे हेच आमचे लक्ष असल्याचे बाळा भेगडे म्हणाले.
बापू भेगडेंना दिलं होतं महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचं उपाध्यक्षपद
विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे. त्यामुळे आता मावळ विधानसभा मतदारसंघात देखील उमेदवारीवरून रस्सीखेच पहायला मिळत आहे. सध्या मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्येच रस्सीखेच असल्याचं दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांची पक्षाकडून राज्य शासनाच्या महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र या पदाची मागणी केली नाही त्यामुळे हे पद नको. तर मावळ विधानसभा मतदारसंघातुन उमेदवारी मागितली असून पक्षाने माझी उमेदवारी जाहीर करावी अशी भूमिका बापू भेगडे यांनी घेतली होती. पत्रकार परिषद घेत बापू भेगडे यांनी ही भूमिका मांडली होती. मात्र, अजित पवार गटाकडून सुनिल शेळके यांनाचं पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या: