Pune Metro :  पुणे महामेट्रोककडून (Pune Metro) खडकवासला ते खराडी (Khadakwaska to Kharadi) या 25 किलोमीटर अंतराचा आराखडा महापालिकेकडे (PMC) सादर केला आहे. या मार्गासाठी 8 हजार 565 कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याची माहिती महामेट्रोकडून देण्यात आली आहे. या आराखड्यात खडकवासला ते स्वारगेट-हडपसर आणि खराडी असा हा स्वतंत्र मार्ग असणार आहे, अशी माहिती महामेट्रोने दिली आहे. या मार्गावर किमान 22 स्थानकं असणार आहे. 


खडकवासला-सिंहगड रस्ता-स्वारगेट-शंकरशेठ रस्ता-राम मनोहर लोहिया उद्यान-मुंढवा चौक-खराडी असा मार्ग असेल. संपूर्ण मार्ग एलिव्हेटेड होणार आहे. हा मार्ग मुख्य सिंहगड रस्त्याने सारसबागेसमोरून गणेश कलाक्रीडा मंचासमोरून जेधे चौक, शंकरशेठ रस्त्याने पुढे जाईल.


पुणे मेट्रोने दुसऱ्या टप्प्यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) नुकताच महापालिकेसमोर सादर केला. मेट्रोचे अधिकारी आणि पुणे महानगरपालिका (PMC) अधिकाऱ्यांनी प्राथमिक चर्चा केली आणि येत्या आठवड्यात मेट्रोच्या प्रस्तावित साइट्ससाठी साइटला भेट दिली जाईल, अशी माहिती महामेट्रोचे जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनवणे यांनी दिली आहे.


कोणती स्थानकं असणार?


खराडी ते खडकवासला या मार्गावर किमान 22 स्थानकं असणार आहे.  खडकवासला, दळवेवाडी, नांदेड सिटी, धायरी फाटा, माणिकबाग, हिंगणे चौक, राजाराम पूल, पीएल देशपांडे पार्क, दांडेकर पूल, स्वारगेट, सेव्हन लव्हज चौक, पुणे कॅन्टोन्मेंट, रेसकोर्स, फातिमानगर, रामटेकडी, हडपसर,  , मगरपट्टा मेन, मगरपट्टा उत्तर, हडपसर रेल्वे स्टेशन, साईनाथ नगर आणि खराडी चौक या ठिकाणी स्थानकं असणार आहे.


लवकरच गरवारे ते डेक्कन मेट्रो धावणार


पुणे मेट्रोने फुगेवाडी मेट्रो स्टेशन ते दापोडी मेट्रो स्टेशनपर्यंत रीच 1 आणि गरवारे मेट्रो स्टेशन ते डेक्कन मेट्रो स्टेशनपर्यंत पहिली चाचणी पूर्ण करून आणखी एक महत्वाचा टप्पा पार केला. या चाचणीला मोठे यश मिळाले. त्यामुळे येत्या काही महिन्यांत गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशनच्या पलीकडे दिवाणी न्यायालयाकडे आणि फुगेवाडी येथून शिवाजीनगर मेट्रो स्टेशनकडे मेट्रो सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे


सध्या कार्यरत असलेल्या गरवारे कॉलेज मेट्रो स्थानकापासून डेक्कन मेट्रो स्थानकापर्यंत आणि परत डेक्कन ते गरवारे स्थानकापर्यंत ही ट्रायल पार पडली. त्याचप्रमाणे ते फुगेवाडी ते दापोडी मेट्रो स्थानक या टप्प्यावर सुद्धा मेट्रोची ट्रायल झाली. दोन्ही गाड्यांचा ट्रायल वेग 15 KMPH होता आणि तो नियोजित प्रमाणे पूर्ण करण्यात आला.