Karuna Sharma Arrested: महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या करुणा शर्मा आणि त्यांचा मित्र अजयकुमार देढेला पुणे पोलिसांनी अटक केलीय. करुणा शर्मा आणि अजय देढेच्या विरोधात त्याच्या पत्नीने पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अजयकुमार देढे हा करुणा शर्माचा पी ए म्हणून वावरत होता. मात्र प्रत्यक्षात दोघांचे प्रेमसंबंध होते. त्यामुळे अजयकुमार देढेने त्याच्या बायकोकडे घटस्फोट देण्यासाठी तगादा लावला होता. त्यासाठी अजयकुमार देढे आणि करुणा शर्मा हे देढेच्या पत्नीला धमकावत होते.
दोघांनी मिळून पुण्यातील भोसरी भागात देढेच्या पत्नीला बोलावून हॉकी स्टीकच्या सहाय्याने धमकावल्याच तक्रारीत म्हटलं. त्याचबरोबर करुणा शर्माने जातीवाचक शिविगाळ केल्याचही तक्रारीत नमूद करण्यात आलय. त्यामुळे करुणा शर्माच्या विरोधात एट्रॉसीटीचा गुन्हा देखील करण्यात आला आहे.
करुणा शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुण्यातील येरवडा पोलिस ठाण्यात एट्रॉसीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. करुणा शर्मा यांच्याविरोधात येरवडा येथील एका महिलेने तक्रार दिली होती. या महिलेने तक्रारीत करुणा शर्मावर धक्कादायक आरोप केले आहे. करुणा शर्माने शस्त्रे दाखवून शिवीगाळ, अपहरण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा वाद काय आहे?
करुणा शर्मांची बहीण रेणू शर्मा यांनी सर्वात गेल्या वर्षी ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंधाबाबत प्रकरण समोर आले. याला धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट करत पुष्टी दिली, तसेच त्यांचे कधीपासून सहसंबंध आहेत या संदर्भात देखील खुलासा केला. यात करुणा शर्मा यांच्यापासून धनंजय मुंडे यांना दोन अपत्य असल्याचे पहिल्यांदा धनंजय मुंडे यांनी फेसबुकवरून जाहीर केले होते. काही दिवसानंतर रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतली. येत्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत बीडमध्ये धनंजय मुंडे विरुद्ध करुणा शर्मा अशी लढत शंभर टक्के होणार असल्याचं शिवशक्ती पक्षाच्या करुणा शर्मा यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे बीडकरांना 2024 साली नवरा विरुद्ध बायको अशी लढत पहायला मिळणार आहे.