Jyotiraditya Scindia: पुण्याची हवाई वाहतूक क्षेत्रात आम्ही विकास करणार आहोत. यासाठी पहिली मागणी उड्डाणासाठी स्लॉट्ससाठीची आहे. त्यामुळे पुण्याला 14 अतिरिक्त स्लॅट्स देणार आहोत. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक वाढवण्याची आहे. त्यासाठी प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात बोलत होते.







पुणे सिंगापूर विमानसेवेचा प्रस्ताव आहे. पुणे सिंगापूर विमानसेवा सुरु करणार आहोत. त्याचबरोबर बँकॉक आणि दोहा या ठिकाणी विमानसेवा सुरु करण्याबाबत देखील आम्ही विचार करतो आहोत. हवाई क्षेत्रास पुण्याचा विकास करणार असल्याचंदेखील ते म्हणाले. पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि त्यातुन कार्गो हब होण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे आहे त्या लोहगाव विमानतळावर आंतरराष्ट्रीय कार्गो हब आणि त्यामार्फत आंतरराष्ट्रीय कार्गो वाहतूक वाढवणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.


पुरंदर विमानतळाची जागा राज्य सरकारने निवडावी


पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी कोणती जागा निवडावी हे माझ्या मंत्रालयाचे काम नाही. हे काम आणि त्याचे सर्वेक्षण हे राज्य सरकारने करायचे आहे. राज्य सरकारने जी जागा निवडायची आहे ती निवडावी आणि आमच्याकडे प्रस्ताव पाठवावा.  पुरंदर तालुक्यातील पारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाची वाडी या सात गावांतील जमीन विमानतळासाठी निश्चित करण्यात आली होती. महाविकास आघाडी सरकारने या जागेत बदल केला होता. मात्र नव्या जागेला संरक्षण मंत्रालयाकडून नकार देण्यात आला होता. मात्र शिंदे-फडणवीस यांच्या सरकारने जुन्या जागेत होणार असं निश्चित केलं आहे. त्यामुळे जुन्या जागेत होणार की नव्या याबाबत त्यांनी कोणतीही स्पष्टता दिली नाही आहे. जागा राज्य सरकारने निवडावी आणि प्रस्ताव पाठवावा, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.


 इलेक्ट्रिक व्हेईकलची स्वारी


ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज पुण्यात गोल्फ कोर्स वरील इलेक्ट्रिक व्हेईकल चालवली.  पुण्याजवळील लव्हळे इथं असलेल्या सिंबायोसिस शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांसोबत ज्योतिरादित्य सिंधीया यांच्या चर्चासत्राच आयोजन करण्यात आलं होतं. चर्चासत्र संपल्यानंतर सिंधीया यांना संस्थेतील प्रदर्शन पाहण्यासाठी जायचं होतं. दोन इमारतींच्यामधे गोल्फ कोर्स असल्याने ज्योतिरादित्य सिंधीया यांनी गोल्फ कोर्सवरील इलेक्ट्रिक व्हेईकल स्वत चालवण्याचा निर्णय घेतला. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सिंबायोसिस शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शा. ब. मुजुमदार आणि सिंबायोसिस शिक्षण संस्थेच्या संचालिका विद्या येरवडेकर हे गोल्फ कोर्सवरील कारमधले यावेळी पॅसेंजर होते. त्यांच्या या इलेक्ट्रिक व्हेईकलची स्वारीच्या व्हिडीओची सध्या चर्चा होत आहे. ज्योतिरादित्य शिंदेंकडून चंद्रकांत पाटलांचं सारथ्य केल्यानं चांगलीच चर्चा होत आहे.