पुणे : जगभरातील शास्त्रज्ञ कोरोना विषाणू संसर्गावर लस विकसित करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे. ही लस कधी येणार याची प्रतीक्षा प्रत्येकालाच आहे. अशातच पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर धनंजय केळकर यांनी 'जलनेती' हा उपाय वापरुन कोरोनाचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो, असा दावा केला आहे. मागील तीन महिन्यांपासून सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन वेळा येथील कर्मचारी ही जलनेती करत असल्याचं त्यांनी सांगितलंय.


मागील तीन महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोना व्हायरसमुळे चिंतेत आहे. कोरोना व्हायरसचा नायनाट करण्यासाठी अनेक देश औषध शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, अद्याप तरी त्यांच्या या प्रयत्नाला यश आले नाही. परंतु, असे असले तरी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर धनंजय केळकर यांनी मात्र 'जलनेती' उपाय कोरोनावर परिणामकारक असल्याचा दावा केलाय. दीनानाथ रुग्णालयातील कोरोना रुग्णाची देखभाल करणाऱ्या डॉक्टर, नर्स आणि सफाई कर्मचारी सध्या जलनेती करत असल्याचे त्यांनी सांगितले.


मागील तीन महिन्यांपासून सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन वेळा येथील कर्मचारी ही जलनेती करतात. त्यामुळे येथील जलनेती करणारा एकही डॉक्टर अथवा रुग्णालयातील इतर कर्मचारी अजूनपर्यंत कोरोना बाधित झाले नाहीत, असा दावाही डॉक्टर केळकर यांनी केला आहे. ही जलनेती करण्यासाठी फक्त 30 ते 40 सेकंद इतका वेळ लागतो. त्यासाठी वेगळे काही करण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. यात खाली मान करुन एका नाकपुडीतील कोमट पाणी ओतून दुसऱ्या नागपुडीतून बाहेर काढायचं आहे.


मुलगा लंडनमध्ये, मुलगी पुण्यात; एकमेकांना प्रत्यक्ष न पाहताच पसंती आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साखरपुडाही संपन्न


पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कुटुंबातील आठ जण कोरोना पॉझिटिव्ह
पुण्यात कोरोना संसर्ग झपाट्याने पसरताना दिसत आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्यानंतर आता पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्याचं काल (4 जुलै) समोर आलं होतं. मोहोळ यांची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली होती. यामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या कुटुंबातील आणखी आठ सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.


जलनेतीतून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणं खरंच शक्य? काय आहे जलनेती? त्याचा फायदा काय? स्पेशल रिपोर्ट