Ahmedabad plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या इरफान शेखचा दफनविधी पार पडला. इरफान मूळचा पिंपरी चिंचवडचा होता. तो गेल्या दोन वर्षांपासून इयर इंडियाचा क्रु मेम्बर होता. 12 जूनच्या विमान दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर इरफानच्या वडिलांचे रक्ताचे नमुने डीएनए रिपोर्टसाठी घेण्यात आले होते. नवव्या दिवशी अर्थात शुक्रवारी त्याचा डीएनए मॅच झाला, मग आज सकाळी साडे सात वाजता पुणे विमान तळावर इरफानचा शव पोहचले. तिथून पिंपरी चिंचवडच्या राहत्या घरी त्याचा मृतदेह आणण्यात आला. मग सगळे सोपस्कार उरकून सकाळी नऊ वाजता मृतदेह हजरत बिलाल दफनभूमीत आणला गेला. अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर दहाव्या दिवशी सकाळी 9:30 वाजता इरफानचा दफनविधी पार पडला.
इरफान हा पिंपरी चिंचवडच्या संत तुकाराम नगर मध्ये राहायला होता. आजी, आजोबा, आई, वडील, भाऊ असं कुटुंब असलेला इरफान दोन वर्षापासून एअर इंडियामध्ये (Ahmedabad Plane Crash) कामाला लागला होता. अत्यंत मनमिळावू असलेला इरफान नुकताच ईदसाठी घरी ही येऊन गेला होता. त्याच्या जाण्याने त्यांच्या नातेवाईकांना धक्का बसला आहे. (Ahmedabad Plane Crash) मिळालेल्या माहितीनुसार, इरफान हा पिंपरी चिंचवड मधील संत तुकाराम नगरचा रहिवाशी होता, मात्र तो मुंबईत राहत होता. 2 वर्षांपासून एअर इंडियाशी जोडला गेला. आधी डोमेस्टिक क्रू आणि नंतर इंटरनॅशनल क्रू मध्ये कार्यरत होता. शेख कुटुंबीय मूळचे साताऱ्यातील मेढा येथील आहेत, मात्र गेल्या पन्नास वर्षांपासून पिंपरीत स्थायिक झाले आहेत.
इरफानचे लंडनच्या दिशेने विमान झेपवण्याआधी आईशी बोलणं झालं होतं. इरफानला नेहमी निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जायला आवडायचं, तो नेहमी म्हणायचा माझ्या आई- वडिलांना मी फिरायला घेऊन जाणार ही त्याची इच्छा अपुर्णच राहिली. बकरी ईद च्या निमित्ताने इरफान पिंपरी- चिंचवड मध्ये आला होता. कुटुंबासोबत त्याने ईद साजरी केली होती. परंतु, तो पुन्हा कधीच परत येणार नाही, अस कुणालाही वाटलं नव्हतं. प्रत्येक वेळी इरफान कुठलं ही विमान उड्डाण घेण्याआधी तो आईशी फोनद्वारे बोलायचा. काल तो काही मिनिटे आधी आई शी बोलला. इरफानचे आई वर खूप प्रेम होतं, अस त्याच्या काकांनी सांगितलं आहे. या घटनेनंतर शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
"आई-वडिलांना एकदा तरी फिरायला घेऊन जाईन" ही इच्छा नेहमी बोलून दाखवणाऱ्या इरफान शेखची ती अंतिम इच्छा अपूर्णच राहिली. बकरी ईदच्या निमित्ताने तो खास पिंपरी-चिंचवडमध्ये आपल्या कुटुंबासोबत सण साजरा करण्यासाठी आला होता. सण साजरा करून पुन्हा आपल्या कामावर परतण्यासाठी तो रवाना झाला, मात्र तो परत कधीच येणार नाही, हे कुणालाही कल्पना नव्हती.
इरफान नेहमीप्रमाणे यावेळी देखील विमान उड्डाण करण्याआधी आपल्या आईशी फोनवर बोलला होता. "आई, लवकरच परत येतो" अशी त्याची शेवटची ओळ होती.