पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी. एस. कुलकर्णींविरोधात तक्रार करण्यासाठी हजारो गुंतवणूकदारांनी पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयामध्ये गर्दी केली. 28 ऑक्टोबरलाच डीएसकेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता आणखी गुंतवणूकदार तक्रार करण्यासाठी पुढे आले आहेत.
गुंतवणूकदारांची मोठी संख्या पाहून आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत टेबल - खुर्च्या टाकून तक्रारी नोंद करुन घेण्यात आल्या. पोलिसांच्या मते, डीएसकेंकडे विविध योजनांमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांची संख्या 33 हजारांहून अधिक आहे.
ज्यामध्ये जेष्ठ नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. गेले अनेक महिने डीएसकेंकडे पैसे गुंतवणारे लोक पैसे परत मिळावेत यासाठी कार्यालयाबाहेर खेटे घालत होते. मात्र डीएसके पैसे परत करु शकत नाहीत, हे स्पष्ट झाल्यानंतर 28 ऑक्टोबरला डीएसकेंविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. त्यामुळे आज डीएसकेंविरोधात तक्रार देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार समोर आल्याचं पाहायला मिळालं.
संबंधित बातम्या
डीएसकेंवर सात गुन्हे दाखल, ड्रीम सिटी प्रकल्प विक्रीला
डीएसकेंचा 1200 कोटींचा घोटाळा, किरीट सोमय्यांचा आरोप
डीएसकेंच्या अडचणीत वाढ, गुंतवणूकदारांकडून पोलिसात तक्रार
शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके अडचणीत, माझाचा विशेष रिपोर्ट
डीएसकेंविरोधात हजारो गुंतवणूकदार एकवटले, पोलिसात तक्रार
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे
Updated at:
01 Nov 2017 12:27 PM (IST)
28 ऑक्टोबरलाच डीएसकेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता आणखी गुंतवणूकदार तक्रार करण्यासाठी पुढे आले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -