पुणे : पुण्यातील गुंडांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपमध्ये सरळ सरळ दोन गट पडल्याचे दिसत आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि भाजप खासदार अनिल शिरोळे यांच्या संमतीनच पप्पू घोलप आणि श्याम शिंदे यांना पक्षप्रवेश दिल्याचं भाजपचे खासदास संजय काकडेंनी आरोप केला आहे.
पक्षातील आमदार आणि पालकमंत्र्यांना विश्वासात न घेतल्यानं नाराजी असल्याचं गिरीश बापट यांनी म्हटलं आहे. त्यामुळे यापुढे जी व्यक्ती पक्षात प्रवेश करेल, त्याची पार्श्वभूमी तपासली जाईल, असेही गिरीश बापट यांनी सांगितले.
विशेष म्हणजे पप्पू घोलप आणि श्याम शिंदेचा पक्षप्रवेश खासदार संजय काकडे यांच्या पुढाकाराने झाला होता. त्यामुळे गुंडांच्या पक्षप्रवेशावरुन आता भाजपमध्ये दोन गट निर्माण झाल्याचे चित्र आहे.