बारामती : शरद पवार हे व्यक्तिमत्त्व तसे कुणालाही न उलगडणारे. महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणाचा गाढा अभ्यास, अन् राजकारणातील खाच-खळगे माहित असणाऱ्या मोजक्या नेत्यांपैकी एक म्हणजे शरद पवार. शरद पवार नामक कोडे अनेकांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो प्रयत्नच राहिला. कारण शरद पवार हे कुणालाही न समजलेले कोडे आहे.

कोणत्याही विषयावर मोजकं आणि नेमकं बोलणारे शरद पवार वैयक्तिक आठवणींबद्दल फार कमी वेळा बोलले आहेत. मात्र, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित 'सुवर्णगाथा' कार्यक्रमात त्यांनी आपल्या पहिल्या भाषणाचे काही मजेशीर किस्से सांगितले.

शरद पवार यांच्या आत्मचरित्रातून त्यांची वैयक्तिक आयुष्यातील वाटचाल अनेकांनी वाचली असेलच. मात्र, शालेय जीवनातील मजेशीर किस्से आणि तेही थेट शरद पवार यांच्या तोंडून ऐकणं, हा एक वेगळा अनुभव... शरद पवारांची कर्मभूमी असलेल्या बारामतीतल्या जनतेला हे भाग्य लाभलं. शालेय जीवनातील आठवणी यावेळी शरद पवार यांनी जागवल्या.

"आयुष्यातील पहिले भाषण दूसरीत असताना केलं. इयत्त दुेसरीत असताना काटेवाडीच्या शाळेत भाषण करण्यासाठी त्यांना 6 मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. 6 मिनिटांनंबर दोन-तीन वेळा बेल वाजली. 10 मिनिटं होऊन गेली. पण पवार भाषण देण्याचे काही थांबेनात. अखेर त्यांच्या गुरुजींनीच त्यांचा सदरा खेचत त्यांना थांबवलं. त्यावेळीपासूनच भाषण करण्याची गोडी लागील आणि ती आजवर तशीच आहे.", असे सांगत असताना शरद पवार बालपणाच्या आठवणीत रमले.

VIDEO : ऐका, शरद पवार यांच्या पहिल्या भाषणाचे किस्से :