Dattatray Bharne : आज राज्यातील लोकप्रतिनिधीचे आकडे पाहिले तर कुणाचे 150 कोटी कुणाचे 200 कोटी असे आहेत. अरे 200 आणि सव्वा दोनशे कोटीचे काय घेऊन बसला आहात, मी त्यांच्यापेक्षा निधीच्या बाबतीत पाच पट 10 पट पुढे गेलो आहे. बाकी आमदारांपेक्षा इंदापूर तालुक्याला 10 पट अधिक निधी दिला असल्याचे वक्तव्य माजी मंत्री आणि इंदापूर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी केलं. अस वक्तव्य करत दत्तात्रय भरणे यांनी सेनेच्या बंडखोर आमदारांच्या आरोपावर एकप्रकारे कबुलीच दिली आहे.


महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील झगडेवाडी येथे 2 कोटी 27 लक्ष रुपयांचा 33/11 केव्ही  विद्युत उपकेंद्राचा भूमिपूजन समारंभ माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संपन्न झाला. यानंतर सभेला संबोधन करताना ते बोलत होते. दरम्यान, निधी वाटपाच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून अन्याय होत असल्याची भावना शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी अनेकवेळा बोलून दाखवली आहे. आता त्यांच्या या विधानावर भरणे इदापूर तालुक्याला अधिकचा निधी दिल्याचे म्हणत एकप्रकारची कबुलीच दिली आहे. सेनेचे बंडखोर आमदार म्हणत होते की आम्हाला निधी मिळत नाही.  त्यावर माजी राज्यमंत्री भरणेंनी इंदापूर तालुक्याला बाकी आमदारांपेक्षा किती जास्त निधी आणला हे सांगितले. 


भर सभेत आईच्या आठवणीनं भरणेंना  हुंदका


भर सभेत बोलताना आईच्या आठवणीने दत्तात्रय भरणेंचा कंठ दाटून आला. 10 दिवसापूर्वीच  माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या आईचे निधन झाले आहे. त्यांच्याविषयी बोलताना भरणेचा कंठ दाटून आला. 


इंदापूर तालुक्याच्या निधीची कमतरता भासू देणार नाही


कोण विरोधक काय म्हणतो याचं मला घेणं देणं नाही. कोण काय म्हणतोय, कोण टीका करतोय यापेक्षा मला माझ्या तालुक्याच्या शेतीचा पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे ते पाहायचं आहे. मी जरी मंत्री नसलो तरी शेवटी या तालुक्याचा आमदार असल्याचे भरणे म्हणाले. विकासाचा निधी कुठून आणायचा, कुठून खेचायचा हे मी पूर्वी जोरात सांगत होतो. मात्र, आता जोरात न सांगता तो कसा आणायचा ते तुम्ही माझ्यावरती सोडा. कारण पुढचे जे कोण मंत्री होतील ना त्यांना पण मी खूप मदत केली आहे. कुणी किती जरी काहीही म्हटलं तरी विधानसभेचा आमदार हा तालुक्याचा प्रमुख असतो. 2014 ला आमदार झालो तेव्हा आपलं कुठे सरकार होतं, मात्र तेव्हा देखील निधी आणल्याचे दत्तात्रय भरणे म्हणाले. आता तर अडीच वर्षात आपण मंत्री होतो. आता एवढं पेरलं आहे की, आता उगवायचंय आणि नुसतं खायचंय असं म्हणतं इंदापूर तालुक्याच्या विकास कामाला निधीची कमतरता भासू देणार नाही असं आश्वासन माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलं. 


महत्वाच्या बातम्या: