पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये आयकर विभागाच्या अधिकाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आकुर्डीत रविवारी रात्री ही घटना घडली. बबलू कुमार असं 32 वर्षीय अधिकाऱ्याचं नाव आहे.

बबलू कुमार आईसह आकुर्डीत राहत होता. आजारपण आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून त्याने आयुष्य संपवल्याचं त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

दोन वर्षांपूर्वी बबलू कुमारचा एक पाय निकामी करण्यात आला होता. यातून त्याला सावरता येत नव्हतं. तो आजारपणाला कंटाळला होता आणि शिवाय त्याच्यावर कर्जही होतं.

मित्रांचं कर्ज त्याने फेडले होतं, मात्र नातेवाईकांचं कर्ज डोक्यावर होतं. हे कर्ज येणाऱ्या फंडमधून देऊन टाकावं, असं त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केलं. त्यानंतर गळफास घेऊन त्याने जीवनयात्रा संपवली.