पुणे : आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण-तरुणींचा वारीत वाढता सहभाग बघता पुण्यात एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्याप्रमाणे वारकरी हरिनामाचा गजर करतात त्याप्रमाणे या तरूणांनाही प्रशिक्षण देण्यात आलं. सिंहगड़ रस्त्यावरच्या विठ्ठलवाडी मंदिरात ही कार्यशाळा पार पडली.

 

गेल्या दोन वर्षांपासून वारीमध्ये आयटी क्षेत्रात काम करणारे तरूण-तरूणी आयटी दिंडीच्या माध्यमातून सहभागी होत आहेत. ज्याप्रमाणे वारकरी हरिनामाचा गजर करतात, भजन करत टाळ वाजवतात, तसे आयटी दिंडीतील सहभागी तरूणांना करता यावे, असं यासाठी वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते.

 

'तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल,जल विठ्ठल निर्मल विठ्ठल' असा संदेश घेऊन सुमारे 900 जण यंदा वारीत सहभागी होणार आहेत. रोजच्या तणावाच्या वातावरणात जगणाऱ्या आयटीयन्सना अध्यात्माचा आनंद मिळावा, या उद्देशाने यंदाची आयटी दिंडी या पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहे.