पुणे : "गेल्या काही वर्षांपासून देशात मागास राहण्याची स्पर्धा लागली होती, मात्र भाजप सरकार आल्यापासून आता विकासासाठी स्पर्धा सुरु झाली आहे. स्मार्ट सिटी योजना त्याचंच प्रतिक आहे," असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यात केलं.
पुण्याच्या बालेवाडी क्रीडा संकुलात आज दिमाखदार सोहळ्यात स्मार्ट सिटी योजनेचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी भाजपचे अनेक दिग्गज मंत्री उपस्थित होते.
देशाच्या 20 शहरांमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारनं 7 हजार 60 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केलं
महाराष्ट्रातील पुणे, आणि सोलापूर ही दोन शहरं स्मार्ट सिटी योजनेतून विकसित केली जाणार आहेत. मात्र या कार्यक्रमाआधी आमंत्रण पत्रिकेत महापौरांचं नाव नसल्याचा आणि सेना-भाजपमधील वादाचा परिणाम आजच्या कार्यक्रमावर दिसून आला. भाजप वगऴता कुठल्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, नेते बालेवाडीकडे फिरकले नाहीत.