पिंपरी-चिंचवड : सिगरेट पेटवण्यावरुन झालेल्या किरकोळ वादातून पुण्यात विद्यार्थ्यांमध्ये राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हिंजवडीतील आयआयएमएस महाविद्यालयात एमबीएचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये फिल्मी स्टाईल हाणामारी झाली.
सिगरेट पेटवण्यासाठी माचिस मागितल्याच्या किरकोळ वादाचं पर्यवसन हाणामारीत झाल्याची माहिती आहे. विद्यार्थ्यांच्या एका गटानं दुसऱ्या गटाच्या विद्यार्थांना फ्लॅटमध्ये जाऊन तलवार आणि लाकडी दांडक्यांनी जबर मारहाण केली.
आयआयएमएस महाविद्यालयातल्या कॉन्व्होकेशन कार्यक्रमानंतर रविवारी रात्री साडेदहा वाजता ही घटना घडली. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे.