IAS probationer Pooja Khedkar : अधिकारी होण्यापूर्वीच थाटात रुबाब करणाऱ्या आयएएस प्रोबेशनर डॉ. पूजा खेडकरची (IAS probationer Dr Pooja Khedkar) पुण्यातून वाशीम येथे बदली करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. तिच्याविरोधात प्रशासनाकडे अनेक तक्रारी आल्यानंतर हा आदेश आला आहे. महाराष्ट्र सरकारचे सहाय्यक सचिव एस एम महाडिक यांनी स्वाक्षरी केलेल्या सरकारी आदेशात या बदलीचे प्रशासकीय कारण नमूद करण्यात आलं आहे. 


पूजा खेडकर ट्रेनी अधिकारी गेल्या दोन महिन्यांपासून प्रशिक्षणार्थी असूनही विशेषाधिकारांची मागणी करत होत्या. खासगी वाहन असलेल्या ऑडीसाठी लाल-निळा दिवा, लेटर पॅड, नेमप्लेट, स्वतंत्र ऑफिस चेंबर आणि स्टाफची सुद्धा मागणी केली होती. पूजा खेडकरला हे विशेषाधिकार मिळाले नसतानाही मागण्यांनी खळबळ उडवून दिली.


वडिलांकडून सुद्धा दबावतंत्राचा वापर


प्रशिक्षणार्थी मुलीच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील (एमपीसीबी) निवृत्त अधिकारी असलेले वडील दिलीपराव खेडकर हे सुद्धा दबावतंत्र वापरून  जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव आणत होते, असाही आरोप आहे. पूजाने तिच्या खासगी वाहनावर लाल-निळ्या दिव्यांचा वापर केला होता, ज्याचे फोटो व्हायरल झाले होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्याही नकळत तिने त्यांच्या चेंबरवर कब्जा केला होता, असाही आरोप आहे. 


कोण आहे पूजा खेडकर?


पूजा खेडकर ही 2022 च्या बॅचची IAS प्रशिक्षणार्थी अधिकारी आहे. तिने UPSC परीक्षेत 821 (Pwd-5) रँक मिळवल्याचे सांगितले जाते. त्या पुण्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाली होती. मात्र आता वाशिममध्ये बदली झाली आहे. तिच्या वडिलांसोबत पूजा खेडकरचे आजोबाही सरकारी कर्मचारी होते. टाईम्स ऑफ इंजियाने दिलेल्या वृत्तानुसार तिची आई अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भालगावच्या निवडून आलेल्या सरपंच आहेत. प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून पूजाने कायमस्वरूपी नियुक्तीपूर्वी तिने विविध विभागांमध्ये काम करणे अपेक्षित होते. मात्र, रुबाब करत खळबळ उडवून दिली आहे. 


नियुक्तीवरूनही प्रश्नचिन्ह 


पूजाची नियुक्ती आणि प्रशासकीय सेवेत प्रवेश करण्याच्या संशयास्पद घटनांमुळे सुद्धा पूजा चर्चेत आहे. 2 फेब्रुवारी 2022 रोजी पूजा खेडकरला नियुक्ती नाकारण्यात आली होती. त्यानंतर पूजाने दृष्टिहीन आणि मानसिक आजारी असल्याचा दावा करणारे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल केले. न्यायालयाने जुलै ते सप्टेंबर 2022 दरम्यान चार वेळा तिची वैद्यकीय तपासणी केली. ती चारही वेळा हजर राहू शकली नाही आणि त्यामुळे न्यायाधिकरणाने तिला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला. 2023 मध्ये, तथापि, तिचे प्रतिज्ञापत्र अपंगत्व हक्क कायदा, 2016 अंतर्गत सादर केले गेले आणि परिणामी तिच्या नियुक्तीला पुढे जाण्यास मंजुरी देण्यात आली.


इतर महत्वाच्या बातम्या