IAS Pooja Khedkar : राज्यभरात चर्चेत आलेली डॉ. पूजा खेडकर (Pooja Khedkar) चे अनेक कारनामे बाहेर आले आहेत. केवळ पूजा खेडकरच नव्हे तर कुटुंबीयांचे देखील कारनामे समोर आले आहेत. गेल्या काही दिवसांपुर्वी पूजा खेडकरचं (Pooja Khedkar) बारामती कनेक्शन (Baramati) समोर आलं होतं. पूजा खेडकरच्या कुटुंबियांनी बारामती तालुक्यात जमीन खरेदी केली असल्याची माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी समोर आणली होती. आता त्या सातबारावरील नावात दुरुस्ती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.


दिलीप धोंडीबा खेडकर ऐवजी दिलीप कोंडिबा खेडकर असा नावात बदल करण्यात आलेला आहे. दिलीप खेडकर यांनी 14 वर्षांपूर्वी 14 गुंठे जमीन बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे खरेदी केलेली असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी समोर आणली होती. बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे दिलीप खेडकर यांची ही जमीन विक्री करायची असल्याने त्या ठिकाणी खेडकर कुटुंबियांनी तसा बोर्ड लाऊन जमीन विकायला काढली आहे. दीड कोट इतकी जमीनीची किंमत असल्याचे सांगितले जात आहे. 


वाघळवाडी ग्रामपंचायत हद्दीत गट क्रमांक 8 मध्ये दिलीप खेडकर यांच्या नावावर जमीन आहे. पण यामध्ये नवीन माहिती समोर आली आहे. वाघळवाडी येथे असलेल्या खेडकर यांच्या 7/12 वरती नावाची स्पेलिंग दुरुस्ती असा बदल करण्यात आली आहे. दिलीप धोंडीबा खेडकर ऐवजी आता नवीन नाव दिलीप कोंडिबा खेडकर असा नावात बदल करण्यात आला आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या खेडकर कुटुंबातील सदस्यांवर चौकश्याचा ससेमिरा लागला असताना 7/12 वरील नोंद दुरुस्त केल्याने अगोदर नावांचा घोळ समोर आला असताना आता नव्याने 7/12 वरील नाव बदल्याने दिलीप कोंडिबा खेडकर? आणि दिलीप धोंडीबा खेडकर? कोण की एकच व्यक्ती आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे.


वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचे बारामती कनेक्शन



पूजा खेडकरचं (Pooja Khedkar) बारामती कनेक्शन समोर आलं होतं. पूजा खेडकरच्या (Pooja Khedkar) कुटुंबीयांनी बारामती तालुक्यात जमीन खरेदी केली असल्याचं माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी समोर आणली आहे. बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे दिलीप खेडकर यांची 14 गुंठे जमीन असल्याचं ट्वीट विजय कुंभार यांनी केलं आहे. वाघळवाडी ग्रामपंचायत हद्दीत गट क्रमांक 8 मध्ये दिलीप खेडकर यांच्या नावावर 14 गुंठे जमीन आहे. ही जमीन त्यांनी 2010 ते 2011 च्या दरम्यान खरेदी केली असल्याचं बोललं जातं आहे. दिलीप खेडकर यांची बारामतीतील वाघळवाडी येथे जमीन असल्यानं खेडकर यांचं बारामती कनेक्शन समोर आलं आहे.


IAS पूजा खेडकर कुटुंबियांची थर्मोव्हेरिटा कंपनीचा लिलाव होणार?



पूजा खेडकरांनी (IAS Pooja Khedkar) अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कंपनीच्या पत्त्याचा वापर केला. त्याच थर्मोव्हेरिटा कंपनीचा आता लिलाव केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या कंपनीने गेल्या तीन वर्षांचा 2 लाख 77 हजारांचा कर थकवला आहे. या प्रकरणी पिंपरी पालिकेने कंपनी सील केलेली आहे. मात्र हा कर 21 दिवसांत भरला नाही तर मालमत्तेचा लिलाव केला जातो, त्या नियमानुसार थर्मोव्हेरिटा कंपनीचा लिलाव केला जाऊ शकतो. फक्त पालिका ही इच्छाशक्ती दाखवणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


पूजा खेडकर गेली कुठे?



पूजा खेडकर (Pooja Khedkar)  कूठे आहे हा प्रश्न आता वेगवेगळ्या तपास यंत्रणांना पडला आहे. यू.पी.एस.सीने प्रशिक्षण थांबल्यानंतर पूजा खेडकर (Pooja Khedkar) वाशीम मधून निघाल्यावर कुठे गेली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दिल्ली पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, खरा पण ती अद्याप दिल्ली पोलिसांना भेटलेली नाही.