पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar)  यांच्या आई मनोरमा खेडकरांना (Manorama Khedkar)  अटक करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातल्या महाडच्या हिरकणवाडी इथे पार्वती हॉटेलमधून मनोरमा यांना अटक करण्यात आली आहे.  मनोरमा खेडकरांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.  शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकरांना अटक करण्यात आली आहे. खेडकर यांच्या वकिलांनी मनोरमा खेडकर यांचा शेतकऱ्यांना धमकावल्याचा व्हिडीओ न्यायाधीशांसमोर प्ले करून त्या शेतकऱ्यांना धमकावत नव्हत्या असा अजब  दावा केला आहे. तसेच  तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन खेडकर यांनी दिले आहे. 


मनोरमा खेडकर यांच्याकडून पिस्तूल जप्त करायचे आहे. मनोरमा खेडकर यांनी ज्या जमीनीवररुन वाद घातला त्या जमिनीची कागदपत्रे तपासायची आहेत. त्यासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी सरकारी वकिलांकडून मागण्यात आली होती. जाणून घेऊया सरकारी वकिल आणि खेडकरांच्या वकिलांनी कोर्टात काय युक्तविाद केला. 


सरकारी वकिलांचा युक्तिवाद


मनोरमा खेडकर यांच्याकडून पिस्तूल जप्त करायचे आहे. मनोरमा खेडकर यांनी ज्या जमीनीवररुन वाद घातला त्या जमीनीची कागदपत्रे तपासायची आहेत. सकाळी सव्वा नऊ वाजता महाडमधून अटक केली आहे. ⁠पिस्तुल रिकव्हर करायचे आहे. ⁠गुन्ह्यात वापरलेली लँड क्रुझर गाडी ताब्यात घ्यायची आहे. आरोपी प्रभावशील व्यक्ती आहे. फिर्यादींवर दबाव आणू शकतात. ⁠इतर आरोपींना अटक करायची आहे.⁠आरोपींची मुळशी तालुक्यात इतरही ठीकाणी मोठी जमीन आहे. या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांना धमकावले आहे का याचा तपास करायचा आहे.  ⁠त्यासाठी पोलीस कोठडी मिळावी.  मिडीया रिपोर्टस पाहून  व्हायरल व्हिडीओ पाहुन खेडकर यांच्या विरोधात तक्रार देण्याचे बळ आले. म्हणून त्यांनी एक वर्षाने तक्रार दिली. ⁠फिर्यादी पासलकर यांच्यावर दबाव होता. म्हणून ते तक्रार देत नव्हते.


खेडकरांचे वकिल


आम्ही जमीन 2006  ला खरेदी केली आहे. ⁠पिस्तुलाचे लायसन्स आहे.आतापर्यंत आरोपीवर एक ही गुन्हा नाही. ⁠307 कलम काल अचानक ॲड करण्यात आले आहे. ⁠त्याधीचे सर्व सेक्शन बेलेबल आहेत. ⁠आम्ही तपासात सहकार्य करु. या प्रकरणी खेडकर यांच्या तक्रीवरुन पासलकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. ⁠या गुन्ह्यात पोलीसांनी तपास करुन चार्ज शीट दाखल केले आहे.⁠असे, असताना एक वर्षाने पुन्हा त्याच घटनेत खेडकर यांना आरोपी करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्टस पाहून एक वर्षाने तक्रार देण्यात आली आहे. ⁠एक वर्षाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचे कारण ही पोलीसांनी दिलेले नाही. ⁠एक वर्षापुर्वी खेडकर यांनी या प्रकरणी पौड पोलीस स्टेशनला अर्ज दिला आहे. त्यांचे म्हणणे दिले आहे. 24 वर्षे खेडकर पिस्टल वापरत आहेत. मागील 24 वर्षात पिस्टलवरुन एक ही गुन्हा किंवा तक्रार नाही. ⁠आम्ही पिस्टल आणि लायसन्स सरेंडर करायला तयार आहोत. कोर्टाला मोबाईलवरील मनोरमा खेडकर यांचा व्हिडीओ दाखवला जात आहे. पासलकर यांचे आठ लोक घटनास्थळी उपस्थित होते त्यामुळे त्यांनी पिस्टल हातात ठेवणे गैर नाही. ⁠घटनेच्या आदल्याच दिवशी खेडकर यांची गाडी आडवण्यात आली होती. त्यांना धमकावण्यात आले होते. आदल्या दिवशी खेडकर यांनी पौड पोलीस स्टेशनला तक्रार देखील दिली होती. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या दिवशी पिस्टल बरोबर ठेवले होते.