पुणे: अंत्योदय रेशन कार्डधार असलेल्या लाभार्थ्यांना वर्षातून एकदा साडी दिली जाते. आता या साड्यांचे वाटप होळीपर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती आहे आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील 48 हजार 874 महिलांना साडी देण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्वात जास्त साड्या या 7 हजार 975 साड्या बारामती तालुक्यामध्ये दिल्या जाणार आहेत.
दरवर्षी मिळते एक साडी
रेशन दुकानावर अन्नधान्य याच्याबरोबरच आता साडीही मिळणार आहे. राज्यातील अंत्योदय शिधा पत्रिकाधारक कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारक प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी रेशन दुकानावर मोफत मिळणार आहे. सरकारने निश्चित केलेल्या सणाच्या दिवशी या साड्यांचं वाटप केलं जाणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी हा सणासुदीचा क्षण आनंदाचा आणि उत्साहाचा होणार आहे.
अंत्योदय कार्डधारकांना मोफत साडी
राज्य सरकारने अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्यासोबतच एक साडी मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक अंत्योदय कार्डधारक बारामती तालुक्यामध्ये असल्याची माहिती आहे. तर सर्वाधिक कमी अंत्योदय कार्डधारक हवेली तालुक्यात असल्याचे आकडेवारीनुसार समोर आले आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी वस्त्रोद्योग विभागाकडून केली जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील सुमारे 48 हजार 874 शिधापत्रिकाधारकांना अर्थात महिलांना याचा लाभ होणार आहे.
कोणत्या तालुक्यात किती महिलांना मिळणार लाभ?
आंबेगाव - 5137
बारामती - 7975
भोर - 1909
दौंड - 7222
हवेली - 251
इंदापूर - 4453
जुन्नर - 6838
खेड - 3218
मावळ - 1536
मुळशी - 540
पुरंदर - 5285
शिरूर - 3990