पिंपरी चिंचवड : वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसात होर्डिंग अंगावर पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पिंपरी चिंचवडमधील पुनावळे येथील ही घटना आहे. पुनावळे येथे सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.
पहाटेपासून शहरात ढग आणि सूर्याचा खेळ रंगला होता. दुपारी साडे तीन वाजता मात्र अखेर पावसाने कृपादृष्टी दाखवली. काही वेळातच गारांचा पाऊसही झाला. आता उकाड्यातून सुटका होणार, या आनंदात शहरवासीय होते. मात्र वाऱ्याच्या वेगासह आलेल्या या पावसाने एकाचा जीव घेतला.
याशिवाय थेरगावच्या धनगरबाबा मंदिर परिसरात रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं. अनेकांच्या घरातही हे पाणी शिरलं. तसेच काही ठिकाणी झाडं पडल्याने वाहनांचंही नुकसान झालं.