पुणे: पुण्यातील कोथरूडमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे. स्टॅन्ड समोर तरुणीला डंपरनं उडवल्याची घटना घडली आहे. यामध्ये या  तरुणीचा मृत्यू झाला आहे. रस्ता क्रॉस करत असताना डंपरची तरुणीला धडक दिली. यावेळी डोक्यावरून मिक्सरचा चाक गेल्याने तरुणीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. ही घटना आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. 


मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात मृत्यू झालेली मुलगी मुळची अमरावती येथील आहे. कोथरूड स्टॅन्ड समोर सिग्नलवरून मुलगी पायी चालत असताना डिव्हायडर वरून रस्ता ओलांडत होती. त्यावेळी मिक्सर डंपर समोर आल्याने ती चाकाखाली गेली. या घटनेत मुलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. मिक्सर चालक यांनी या घटनेनंतर तिथून पळ काढला आहे. या घटनेचा अधिक तपास अलंकार पोलीस करत आहेत.


आरती सुरेश मनवाने (वय 23) एरंडे होस्टेल भेलके नगर कोथरूडमध्ये वसतिगृहात राहत होती. कोकण एक्सप्रेस हॉटेल येथून कर्वे रोडने डिव्हायडर वरून रोड क्रॉस करत असताना तिला डंपरने धडक दिली यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला आहे.