रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर हाईट बॅरियर्स बसवण्यास सुरुवात झाली आहे. बेशिस्त वाहनचालक तसंच अवजड वाहनांकडून सातत्यानं होणारी लेन कटिंग आणि त्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे.


लेन कटिंग करणाऱ्या अवजड वाहनांना या हाईटस् बॅरियर्सच्या माध्यमातून ब्रेक लावला जाणारा आहे. एक्स्प्रेस मार्गावरील खालापूर टोलनाक्यापासून 3 किलोमीटर अंतरावर प्रायोगिक तत्त्वावर हे हाईट बॅरियर्स बसवण्यात येत आहेत.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील लेन कटिंगमुळे अपघात कमी करण्यासाठी गेल्या महिन्यापासून गोल्डन आरची मोहीम सुरु करण्यात आली आहे. तर दुसरीकडे अवजड वाहनांकडून होणारी लेन कटिंग कमी करण्यासाठी हाईट बॅरिअर्स लावण्याचं काम सध्या खालापूर टोल नाक्याजवळ सुरु आहे.

बोरघाटापर्यंत हे हाईट बॅरिअर्स लावण्याचं काम सध्या  सुरु असून, यामुळे फास्ट लेनमधून अवजड वाहनांना लेन कटिंग करता येणार नाहीत. यातून अपघात टाळणे शक्य होईल,असा विश्वास वाहतूक शाखेनं व्यक्त केला आहे.