पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती यांची पोलीस कोठडी आज संपत आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात हजर केलं जाणार आहे. सध्या कुलकर्णी दाम्पत्य पोलीस कोठडीमध्ये आहे.
डीएसके आणि त्यांच्या पत्नीच्या पोलीस कोठडीत वाढ होईल की, त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवलं जाईल, ते पाहणं महत्त्वाचं आहे. डीएसकेंना न्यायालयीन कोठडी सुनावली तर त्यांची रवानगी येरवडा कारागृहात होऊ शकते.
डीएसकेंना नोव्हेंबरमध्ये अंतरिम संरक्षण देताना गुंतवणुकदारांचे 50 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले होते. मात्र, ही रक्कम जमा करण्यात डीएसकेंना वारंवार अपयश आलं. त्यामुळे मुंबई हायकोर्टाने डीएसकेंना अटकेपासून दिलेलं संरक्षण काढून घेतलं. त्यानंतर डीएस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांना दिल्लीतील डीएमआर सिएट या हॉटेलमधून अटक करण्यात आली.
डीएसके आणि पत्नी हेमंतींची पोलीस कोठडी संपणार, पुन्हा कोर्टात हजेरी
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे
Updated at:
01 Mar 2018 09:39 AM (IST)
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती यांची पोलीस कोठडी आज संपत आहे. आज त्यांना पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यांच्या कोठडीत वाढ होईल, की न्यायालयीन कोठडी सुनावली जाते, ते पाहणं महत्त्वाचं आहे.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -