पुणे: गुजरातमधील आरक्षणासाठी आंदोलन करणारे हार्दिक पटेल यांची काल तुरूंगातून सुटका झाली. त्यानंतर त्यांनी आज पुण्यातल्या एमआयटीमध्ये सुरू असलेल्या छात्र संसदेला हजेरी लावली.


मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दर्शवत त्यासाठी काढण्यात येणाऱ्या मूक मोर्चाचं हार्दिकनं स्वागत केलं आहे. 'या देशात हक्क मागणारा देशद्रोही ठरतो, मी खरं बोललो म्हणून मला तुरूंगात टाकलं.' अशा शब्दात हार्दिक पटेलनं मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

यावेळी हार्दिकनं व्हायब्रंट गुजरातवरूनही हल्लाबोल केला. सध्या मेक इन इंडियाची नव्हे तर मेड इन इंडियाची गरज असल्याचं हार्दिक पटेल म्हणाले.