शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर भाजपमध्ये प्रवेश करणार
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 18 Jan 2017 11:19 AM (IST)
पुणे : राष्ट्रवादीचे नेते आझम पानसरे यांच्यानंतर पिंपरी चिंचवडमधील आणखी एक मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर आज दुपारी एक वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे. ही बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गजानन बाबर यांचा पक्षप्रवेश पार पडेल. गेल्या लोकसभा निवडणुकीत गजानन बाबर यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने मनसेत प्रवेश केला होता. मात्र, विधानसभेपूर्वी बाबर यांनी मनसेला राम राम ठोकला. तेव्हापासून गजानन बाबर कुठल्या पक्षात जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर गजानन बाबर भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत.