महाराजांचे विचार अंमलात आणणारा खरा शिवभक्त असल्याचं राज्यपाल बेनके यांच्याकडे म्हणाले. ते केवळ महाराज नव्हे तर एक अवतार होते. असे अवतार जिथं जन्म घेतात ती भूमी पवित्र असते. म्हणून याठिकाणी येण्याचं मी ठरवलेलं होतं. असं बेनके यांच्याकडे मनमोकळेपणाने बोलले.
खासदार संभाजीराजे यांच्याकडून राज्यपालांचे कौतुक
राज्यपालांनी वयाच्या 79 व्या वर्षी किल्ले शिवनेरी 'पायी' सर केला. ही आमच्या सारख्या गडप्रेमी शिवभक्तांसाठी समाधान देणारी गोष्ट आहे. त्यापेक्षाही पुढे जाऊन त्यांनी जे प्रत्येक मंत्र्याने एकेक किल्ला दत्तक घेण्याचे आवाहन केले त्याचे मी मनापासून स्वागत करतो.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धन मोहिमेत सरकारने शिवप्रेमींना सहकार्य करून पाठिंबा द्यावा ही अपेक्षा नेहमीच केली गेली. त्यामुळे राज्यपालांनी जो प्रत्येक मंत्र्याला गड दत्तक घेण्याची सूचना केली ती रास्त आहे.
राज्यपाल महोदयांना माझी अजून एक विनंती असेल, जी मी अनेक वर्षांपासून मागणी करत आहे. दरवर्षी कॅबिनेटची एक बैठक रायगडवर घेण्याचे आदेश आपण द्यावेत. जेणेकरून महाराजांनी ज्या धेयवादाने रायगड वर राज्याभिषेक करवून घेतला, तो राजकारणी आणि अधिकाऱ्यांना लक्षात येईल. स्वराज्याला सुराज्यात रूपांतरित करून प्रशासनासाठी उत्तम राज्यकारभार नेमका कसा करावा याची प्रेरणा मिळेल, अशी फेसबुक पोस्ट खासदार संभाजीराजे यांनी केली आहे.
Governor at Shivneri Fort | भर पावसात राज्यपाल कोश्यारी चालत शिवनेरीवर, अवघ्या 50 मिनिटात गाठला गड