सुरक्षेच्या कारणास्तव दत्ता फुगेंचा सोन्याचा शर्ट चिंचवडच्या रांका ज्वेलर्स या शाखेत ठेवण्यात आला. त्यानंतर पैश्यांची गरज भासल्यानं दत्ता फुगेंनी काही रक्कम रांका ज्वेलर्स यांच्याकडून घेतली होती. परंतू यासाठी अव्वाच्या सव्वा व्याजदर लावल्यानं रांका ज्वेलर्सविरोधात न्यायालयात दाद मागितल्याचंही शुभमनं सांगितलं आहे.
फुगेच्या सोन्याच्या शर्टची देशभरात चर्चा
दत्तात्रय फुगेच्या सोन्याच्या शर्टची देशभरात चर्चा होती. इतकंच नाही तर फुगेची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली होती. सर्वांत महागडा सोन्याचा शर्ट खरेदी करण्याचा विक्रम दत्ता फुगेच्या नावावर नोंदवण्यात आला होता.
फुगेच्या पत्नी सीमा फुगे या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आहेत. बनावट जातप्रमाणपत्रामुळे त्यांचं नगरसेवकपद रद्द करण्यात आलं.
मुलासमोरच फुगेची दगडाने ठेचून हत्या
दत्तात्रय फुगेची दिघीमध्ये 14 जुलै रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास मुलासमोरच दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून घरी येताना हा प्रकार घडला. दत्ता फुगेच्या हत्येप्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली. सर्व आरोपींना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शुभम फुगे काय म्हणाला? पाहा व्हिडीओ: