पिंपरी-चिंचवड : गोल्डमॅन दत्तात्रय फुगेच्या हत्येनंतर आता त्याचा साडेतीन किलो सोन्याचा शर्टही गायब झाला आहे. पिंपरीमध्ये दत्ता फुगेची 14 जुलै रोजी मुलासमोरच दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती.


 

 

दत्ता फुगेच्या हत्येनंतर पोलिस तपास सुरु आहे. यात फुगेचा साडेतीन किलो सोन्याचा शर्ट गायब झाल्याचं समोर आलं आहे. शिवाय कुटुंबीयांनाही या शर्टबाबत माहिती नसल्याचं समजतं.

 

 

यासंदर्भात पोलिसांनी दत्ता फुगेचा मुलगा शुभमला विचारणा केली असता तो म्हणाला की, सोन्याचा शर्ट चिंचवडच्या रांका ज्वेलर्सकडे ठेवला होता. तर शर्ट बनवल्यानंतर इथे कधीही आणला नसल्याचा दावा रांका ज्वेलर्सने केला आहे. त्यामुळे शर्ट नेमका गेला कुठे, असा प्रश्न सध्या पोलिसांना पडला आहे.

 

 

फुगेने सोन्याचा शर्ट बनवल्यानंतर त्याच्यामागे आर्थिक अडचणी सुरु झाल्या. त्यातच त्याने सोन्याचा शर्ट विकला असावा, अशी शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे.

 



मुलासमोरच फुगेची दगडाने ठेचून हत्या

दत्तात्रय फुगेची दिघीमध्ये 14 जुलै रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास मुलासमोरच दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून घरी येताना हा प्रकार घडला. दत्ता फुगेच्या हत्येप्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली. सर्व आरोपींना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

 

फुगेच्या सोन्याच्या शर्टची देशभरात चर्चा

दत्तात्रय फुगेच्या सोन्याच्या शर्टची देशभरात चर्चा होती. इतकंच नाही तर फुगेची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्‌समध्ये नोंद झाली होती. सर्वांत महागडा सोन्याचा शर्ट खरेदी करण्याचा विक्रम दत्ता फुगेच्या नावावर नोंदवण्यात आला होता.

 

फुगेच्या पत्नी सीमा फुगे या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आहेत. बनावट जातप्रमाणपत्रामुळे त्यांचं नगरसेवकपद रद्द करण्यात आलं.

 

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवडचा गोल्डमॅन दत्ता फुगेची दगडाने ठेचून हत्या


साखळदंडासारख्या चेन, जाडजूड ब्रेसलेट्स, दत्ता फुगेंची हत्या


दत्ता फुगेंच्या सोनेरी शर्टची झळाळी गिनीज बुकमध्ये


गोल्डमॅन दत्ता फुगेंचा जावई गोळीबारात जखमी


पिंपरीच्या नगरसेविका सीमा फुगेंचं पद रद्द


‘गोल्डमॅन’ ही राष्ट्रवादीची संस्कृती आहे का? 


हायकोर्टाने सीमा फुगे यांची याचिका फेटाळली