Pune Bhimthadi Jatra : भीमथडी जत्रेत भरडधान्य आणि त्याचे शेकडो प्रकार (pune) पाहण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. 2023 हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष आहे. त्या निमित्त देशभरात भरड धान्याविषयी सर्वत्र जनजागृती सुरु आहे. भरडधान्य ही आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असल्याने त्याचा आहारातील वापर हळूहळू वाढत चालला आहे. रोजच्या आहारातील गहू, तांदूळ यामध्ये ग्लूटेन आणि कार्बोहायड्रेड हे आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक आहे. यापासून बनवलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सध्या भरडधान्याचे पदार्थ खाण्यास अनेक लोक प्राधान्य देत आहेत. 


ज्वारी, बाजरी, मका नाचणी ही भरड धान्यच असून त्यामध्ये कमी प्रमाणात न्यूट्रियंट असतात. त्याही पुढे पॉझिटिव्ह मिलेटमध्ये राळे, भगर, सावा, बर्टी, वरई या प्रकाराची भरड धान्य आरोग्यास उत्तम असून यांच्या नियमित खाण्याने बरेच आजार देखील बरे होतात. हे सर्व प्रकारच्या भरड धाण्याचे आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असणारे विविध पदार्थ बनवता येतात. हे पदार्थ नेमके कोणकोणते असतात आणि ते किती चविष्ट असतात हे भीमथडी जत्रेत बघायला मिळत आहेत. त्यामुळे अनेक फिटनेस फ्रिक लोक हे भरड धान्याचे वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी भीमथडीत गर्दी करत आहेत.


भीमथडी जत्रेमध्ये सर्व प्रकारची धान्य आणि या पासून बनवलेली पीठे, पास्ता, पापड, नूडल्स, रागी, बिस्कीट, ढोकळा, डोसा, इडली, पोहे, लाडू, आंबील, कुकीज, चकली, कुरकुरे, दलिया, थालिपीठ, उपमा, खाकरा, खीर असे कितीतरी प्रकार पुणेकरांना पाहायला मिळणार आहेत. आपण केलेल्या खरेदीच्या जोरावर शेतकरी बंधूना पिकाचा नवीन प्रकार उपलब्ध होणार आहे. 


ग्रामीण आणि शहरी संस्कृती


दरवर्षी डिसेंबरमध्ये भीमथडी जत्रा भरवली जाते. यात ग्रामीण आणि शहरी संस्कृतीचं दर्शन होतं. विविध पारंपारिक खेळ, खवय्यांसाठी वेगवेगळ्या पदार्थ्यांची रेलचेल बघायला मिळते. शिवाय रोज संध्याकाळी विविध कार्यक्रमाचं आयोजनही केलं जातं. खान्देशातील मांडे हा भीमथडी जत्रेतील महत्त्वाचा पदार्थ आहे. वर्षभर पुणेकर खास मांडे खाण्यासाठी भीमथडी जत्रेची वाट बघत असतात. 


पारंपारिक खेळांची रेलचेल


बैलगाडी, पारंपारिक पदार्थ, पारंपारिक खेळ त्यासोबतच टाकाऊतून टिकाऊ, महाराष्ट्राची कला संस्कृती, पर्यावरण संवर्धन, एकात्मिक शेती, मत्स्यशेती या विषयांवरील विविध दालने या भीमथडी जत्रेत आहेत. उद्या (25 डिसेंबर) या जत्रेचा शेवटचा दिवस असणार आहे. 


हेही वाचा