पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये अभ्यासाच्या तणावामुळे आणखी एका तरुणीने आत्महत्या केली आहे. प्रिती जाधव असं तिचं नाव असून, ती मूळची बीड जिल्ह्यातील आहे.
प्रीती स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून चिंचवडच्या साई पूजा लेडीज हॉस्टेलमध्ये राहत होती. मात्र ती स्पर्धा परीक्षा अभ्यासाच्या तणावात आली होती, तसं आत्महत्येपूर्वी तिने चिट्ठीत नमूद ही केलं आहे. तिच्या सोबत इतर चार मुलीही सोबतीला होत्या, मात्र आज सकाळी त्या कामावर गेल्यानंतर तिने गळफास घेतला.
दुपारी दीडच्या सुमारास एक मैत्रीण रूम आली आणि प्रीती दार उघडत नसल्याने तिने हॉस्टेल मालकाला याबाबत सांगितले. मालकाने खिडकीतून पाहिले असता आत्महत्या केल्याचं उघड झालं.
दोनच दिवसापूर्वी इंग्रजी माध्यमाचा अभ्यास झेपत नसल्याने भोसरीतील खुशी सिंग या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. ती सातवीत शिकायला होती.
स्पर्धा परीक्षेच्या तणावातून पिंपरीत तरुणीची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Mar 2018 08:29 PM (IST)
प्रीती स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून चिंचवडच्या साई पूजा लेडीज हॉस्टेलमध्ये राहत होती. मात्र ती स्पर्धा परीक्षा अभ्यासाच्या तणावात आली होती, तसं आत्महत्येपूर्वी तिने चिट्ठीत नमूद ही केलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -