पुणे : पुण्यात मागील काही दिवसांपासून किरकोळ कारणासाठी गोळीबार (pune crime news) केल्याच्या घटना सातत्त्याने समोर येत आहे.क्रिकेटच्या वादातून गोळीबार करण्यात आल्याची घटना ताजी असतनाच आता गर्लफ्रेंडने संपर्क तोडल्याने बॉयफ्रेंडने चिडून तिच्या घराबाहेर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात गर्लफ्रेंडची बहिण जखमी झाली आहे. तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहे. काल मध्यरात्री पुण्यातीस गंजपेठेत ही घटना घडली आहे. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषी बागुल असं गोळीबार केलेल्या आरोपीचं नाव आहे.


प्रेयसीचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर तिचे आणि आरोपी प्रेम संबंध होते. मात्र काही क्षृल्लक कारणावरुन वाद झाले होते. त्यामुळे प्रेयसीने ऋषीता फोन ब्लॉक केला आणि त्याच्याोबत संपूर्ण संपर्क कमी केला. हे पाहून ऋषीला राग आला. ती भेटत नसल्याचं पाहून ऋषीचा राग अनावर झाला आणि तो थेट प्रेयसीच्या घरी मध्यरात्री पोहचला. त्यावेळी प्रेयसीची बहिण आणि त्याचे वाद झाले. हे सगळा पाहून त्याने थेट प्रेयसीच्या बहिणीवर बंदूक रोखली आणि तिच्यावर गोळीबार करुन तिचा खून करण्याचा प्रयत्न केला. मला जर ती मिळाली नाही तर मी कोणाला सोडणार नाही, ही धमकी दिली आहे घर बाहेरुन लॉक करुन निघून गेला. 


हा सगळा प्रकार पाहून दोघीही घाबरल्या त्यांनी थेट पोलिसांशी संपर्क करुन त्यांना या संबंधी माहिती दिली. हे ऐकताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोघींची मदत केली. जखमी झालेल्या बहिणीला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केलं. तिच्यावर उपचार सुरु आहेत. पुण्यात गुन्हेगारीने डोकं वर काढलं आहे. याच गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी पोलीस उपाययोजना करत आहेत. मात्र तरीही गुन्हेगारी संपायचं नाव घेत नाही आहे. 


इतर महत्वाची बातमी-


पुण्यात भरधाव वेगाचे दोन बळी; पब फक्त नावालाच बंद, रात्रीचा धिंगाणा सुरुच, आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली!


पुण्यात भरधाव सुपरकारने पार्टी करुन परत येणाऱ्या दोघांना चिरडलं; मध्यरात्रीच्या घटनेनं थरकाप


Pune Accident News : भरधाव वेगाचे दोन बळी, नंबर प्लेट नसलेली पोर्शे अन् अल्पवयीन चालक, नियमांचे तीन तेरा पाहून पोलीस काय म्हणाले?