पुण्यात धावत्या कारमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार
एबीपी माझा वेब टीम | 20 Apr 2016 02:27 AM (IST)
पुणे: हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जाण्याचं आमिष दाखवून तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. पीडित तरूणी मुळची अमरावतीची असून कामानिमित्त ती पुण्यात वास्तव्यास आहे. घटनेच्या दिवशी हॉटेलमध्ये जेवायला जाण्याच्या बहाण्यानं विकी नावाचा तरूण पीडित तरूणीला आपल्या कारमधून घेऊन गेला. मात्र, वाटेत विकी आणि त्याच्या मित्रानं धावत्या कारमध्ये पीडित तरूणीवर बलात्कार केला. त्यानंतर आरोपी तरुणीला कारमध्ये बंद करून मित्राच्या साखरपुड्याला गेले. घरी परतताना आणखी दोन तरूणांनी पीडित तरूणीवर अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून चौघांना अटक करण्यात आली आहे.