पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या गणेशोत्सव देखावा स्पर्धेच्या निकालावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. वर्गणी न दिल्यामुळे उठाबशांची शिक्षा देणाऱ्या भोसरीतील श्रीराम मित्रमंडळाला पालिकेने बक्षीस जाहीर केलं आहे.

समाजप्रबोधनपर देखावा गटात श्रीराम मंडळाला द्वितीय क्रमांक विभागून देण्यात आला आहे. 151 रुपयांची वर्गणी न दिल्यानं याच मंडळाने बेकरीच्या कर्मचाऱ्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा दिली होती.

श्रीराम मंडळाचं हे कृत्य प्रसारमाध्यमांनी चव्हाट्यावर आणल्यानंतर मंडळाने प्रसार माध्यमांचं डोकं ठिकाणावर आहे का? हा देखावा सादर केला होता. याच देखाव्याला समाज प्रबोधनपर देखावा गटात पारितोषिक जाहीर केलं आहे.

रस्त्यावर बेकरीतील कर्मचाऱ्यांना उठाबशा काढायला लावाणाऱ्या कार्यकर्त्यांचा आवेश बघता कुणीही त्यांना रोखण्यासाठी पुढे आलं नाही.  हा प्रकार 15 ऑगस्टला आळंदी रस्त्यावरच्या एका बेकरीच्या दुकानात घडला आहे.

VIDEO: