पुणे : पुण्यात आता पीएमपीएमएलनं महिन्यातला एक दिवस फुकट प्रवास करता येणार आहे. दर महिन्याच्या शेवटच्या सोमवारी पुणेकरांना मोफत प्रवास करता येणार आहे.


खासगी वाहनांची संख्या वाढल्यानं पीएमपीएमएलकडे नागरिकांचं दुर्लक्ष होत असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे प्रवाशांना पीएमपीएमएलकडे आकर्षित करण्यासाठी महापालिकेनं हा निर्णय घेतला आहे.

प्रवाशांची संख्या वाढावी यासाठी महिन्यांतून एक दिवस पूर्णपणे मोफत प्रवासाची सुविधा द्यावी, असा प्रस्ताव माजी उपमहापौर आणि नगरसेवक आबा बागुल यांनी स्थायी समितीला दिला होता. या प्रस्तावाला स्थायी समितीत एकमतानं मंजुरी देण्यात आली.

दरम्यान एका दिवसाचं उत्पन्न पालिकेनं द्यावी अशी मागणी पीएमपीएमएलनं म्हटलं आहे. या महिन्यात मुख्य सभेची मान्यता मिळाल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.