पुणे : शाळेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. पुण्यातील दत्तवाडी परिसरातील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमध्ये ही घटना घडली आहे.
शिवम तुकाराम खंडाळे (वय 11 वर्ष) असं मृत विद्यार्थ्याचं नाव असून तो कोथरुडला राहत होता.
शुभमखेळत असताना बॅडमिंटनचं अडकलेलं फूल काढण्याचा प्रयत्न करत होता. मात्र ऑडिटोरिअमची खिडकी उघडून तो अडकलेलं फून काढायला गेला. पण त्याचवेळी तो तिसऱ्या मजल्यावरुन कोसळल्याचं समजतं.
यानंतर शुभमला खासगी रुग्णालयात दाखल केलं, मात्र त्याआधीच त्याने प्राण सोडले होते.