Pune PMPML Bus: दिव्यांग नागरिक,स्वातंत्र्य सैनिक व विशेष प्राविण्य प्राप्त नागरिकांसाठी PMPML कडून मोफत बस पास योजना पुरवण्यात येते. या बससेवेचा प्रावीण्याप्राप्त विद्यार्थ्यांना होतो. याच मोफत बससेवा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे.  29 जुलै 200 पर्यंत विद्यार्थांना आता अर्ज करता येणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या या https://dbt.pmc.gov.in वेबसाईटवर हा अर्ज करावा लागणार आहे.


हा अर्ज करण्यासाठी महापालिकेने काही नियम आणि अटी दिल्या आहेत. त्यात पुणे महानगरपालिका हद्दीमधील 3 वर्षे वास्तव्य असलेले दिव्यांग नागरिक, केंद्र व राज्य शासन यांचेकडून विशेष प्रावीण्य (राष्ट्रपती पदक, शौर्य पदक इ.) मिळालेले व स्वातंत्र्यसैनिक यांनीच अर्ज करावा. केंद्र व राज्य शासन यांचेकडून विशेष प्रावीण्य (राष्ट्रपती पदक, शौर्य पदक इ.) मिळाल्याचे प्रमाणपत्र व स्वातंत्र्यसैनिक असल्यास अपलोड करणं आवश्यक आहे. अपत्य पडताळणीसाठी रेशनिंग कार्डची प्रत आवश्यक. आहे तसेच कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीत किमान 3 वर्षेवास्तव्य असल्याचा दाखला म्हणून गत 3 वर्षांचा मनपा टॅक्स पावती किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल (लॅण्डलाईन) किंवा झोपडी फोटो पास/झोपडी सेवा शुल्क पावती/भाडे करारनामा इ. जोडावा लागणार आहे. 


1 मे 2001 नंतर जन्माला आलेल्या व हयात अपत्यांमुळे कुटुंबाच्या अपत्यांची संख्या दोनपेक्षा जास्त झाल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही. राज्य शासनाने ठरवून दिलेल्या टक्केवारीनुसार 40 % किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याचा दाखला तसेच शासन वेळोवेळी जे बदल सुचवतील त्या प्रमाणात नियम व अटीत बदल करण्यात येईल. 


 






आधार कार्ड झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक आहे. 4  एप्रिल 2022 ते 30 मे 2022 पर्यंत सकाळी 11 ते सायं 5:30 पर्यंत ऑनलाइन अर्ज विनामूल्य भरण्याची सुविधा त्या त्या कार्यक्षेत्रातील क्षेत्रीय कार्यालयामध्ये करण्यात आली आहे. ऑनलाइन पद्धतीने आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र लाभाथ्यांचे पासेस पी.एम.पी.एम.एल.कडून तयार करून झाल्यानंतर
त्यांच्यामार्फत सेंट्रल कंट्रोल सेंटर, तळमजला, स्वारगेट, पुणे 37 येथे वाटप करण्यात येईल. लाभार्थ्याने वरीलप्रमाणे नमूद केलेल्या योजनेकरिता व नियम व अटीप्रमाणे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे व कागदपत्रे मूळ प्रतीस्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे.