सुसाट फॉर्च्युनर हॉटेलमध्ये घुसली, कामगाराचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 30 Apr 2018 03:29 PM (IST)
सांगवीतील फेमस चौकात भरदुपारी एकच्या सुमारास ही थरारक घटना घडली. या अपघातात आणखी दोन जण जखमी झाले आहेत.
पुणे: सुसाट फॉर्च्युनर हॉटेलमध्ये घुसल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. सांगवीतील फेमस चौकात भरदुपारी एकच्या सुमारास ही थरारक घटना घडली. या अपघातात आणखी दोन जण जखमी झाले आहेत. दुपारी एकच्या सुमारास फॉर्च्युनर कार सुसाट वेगाने आली. मग आहे त्याच वेगाने ती सरळ हॉटेलमध्ये घुसली. पापणी लवण्यापूर्वीच हा अपघात झाला. कोणाला क्षणभर काय झालंय हेच कळलं नाही. कार थेट सुसाट येऊन आत घुसल्याने, हॉटेलमधील दोघांसह ड्रायव्हर जखमी झाला आहे. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. दरम्यान, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन, पुढील तपास सुरु केला आहे. ही गाडी कोणाची, चालक कोण, याबाबतची माहिती पोलिस मिळवत आहेत.