पुणे : पिंपरी चिंचवड दहशतवादी विरोधी पथकाने (pune Crime news) बनावट कागद पत्रासह पाच बांगलादेशी (Bangladeshi) नागरिकांना अटक करण्यात आली आहे. बनावट कागदपत्रांसह भारतात बेकायदेशीर रित्या राहणाऱ्या 5 जणांना दहशत विरोधी शाखेने अटक केली आहे. ही कारवाई भोसरी भागातील शांतीनगर परिसरात केली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी शमीम नुरोल राणा, राज उर्फ सम्राट सदन अधिकारी, जलील नरू शेख उर्फ जलील नूर मोहम्मद गोलदार ,वसीम अजीज उलहक मंडल उर्फ वसीम अजीऊल हक हिरा,आझाद शमशुल शेख उर्फ अबुल कलाम शमशुद्दिन फकीर या पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली असून त्यांना बनावट कागदपत्रे बनवून देणाऱ्या इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हे बांगलादेशी नागरिक असून त्यांच्याकडे कोणताही परवाना किंवा वैध कागदपत्रा शिवाय राहत होते
ते बेकायदेशीर रित्या भारतात बनावट आधार कार्ड, जन्माचा दाखला व शाळा सोडल्याचा दाखला ,पासपोर्ट बनवून राहत होते. याबाबत दशत विरोधी पथकाला याची माहिती मिळताच त्यांनी छापा टाकून पाचही नागरिकांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी सिम कार्ड अकरा हजार रुपये किमतीचा मोबाईल, एअरटेल कंपनीचे सिम आदी साहित्य जप्त केले. त्यांच्यावर परकीय नागरिक कायदा पारपत्र अधिनियम व भारतात प्रवेश करण्याचा नियम यानुसार गुन्हे दाखल केले आहेत.
बांगलादेशीत वाढ
काही दिवसांपूर्वी पुण्यातील अवैध पद्धतीने वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई होती. रात्री विशेष मोहिमेंतर्गत 19 बांगलादेशींना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले होते. यात 10 महिला आणि 9 पुरुषांचा समावेश होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील बुधवार पेठ परिसरात हे बांगलादेशी लोक राहत होते. यातील 10 महिला बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय करत होत्या तर पुरुष वेगवेगळ्या ठिकाणी काम करत होते. ही कारवाई पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून करण्यात आली आहे. बुधवार पेठेतील सागर नावाच्या इमारतीतून या 19 जणांना ताब्यात घेतलं आहे. या 19 जणांकडे कोणतीही वैध कागदपत्रे नाहीत. तसेच भारत बांगलादेशी सीमेवरुन अनधिकृत भारतात प्रवेश केल्याचं देखीस समोर आलं होतं.
इतर महत्वाची बातमी-