पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या मुळशी येथील फार्महाऊसला मोठी आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीची घटना समोर आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला आगीची माहिती दिली.

Continues below advertisement


माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांच्या मदतीने आग विझवण्यात आली असून, सध्या कूलिंगचं काम सुरु आहे. मात्र आग नेमकी कशामुळे लागली याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.



घोटवडे फाट्यापासून काही अंतरावर मुळा नदीच्या काठावर हा फार्महाऊस आहे. संध्याकाळी 6.30 च्या सुमारास फार्महाऊसला आग लागली होती. आगीमुळे परिसरात धुराचे लोळ पसरले होते. फार्महाऊस शेजारी असलेल्या रस्त्यावरुन दूरुनच धुराचे लोळ दिसत होते.