सुनिता गलांडे, शितल शिंदे, योगेश मुळीक, संदीप जऱ्हाड या नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजयी मिरवणूक काढून, फटाके फोडून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याने चौघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गलांडे, शिंदे, मुळीक आणि जऱ्हाड हे चारही नगरसेवक पुण्यातील प्रभाग क्रमांक चारमधून निवडून आले होते.
नागपूर, पुण्यात निकालानंतर मिरवणुका, घोषणाबाजी आणि फाटके फोडण्यास बंदी!
जवळपास 150 ते 200 कार्यकर्त्यांसोबत आनंदपार्क ते दत्त मंदिर वडगाव शेरी या मार्गावर त्यांनी मिरवणूक काढत आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. लोकांच्या जीवितास धोका निर्माण करणारे स्फोटक फटाके फोडून हलगर्जी केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.
मतमोजणीच्या दिवशी विजयी मिरवणुका, घोषणाबाजी आणि फाटके फोडण्यास नागपूर आणि पुणे पोलिसांनी मनाई केली होती. उमेदवाराच्या विजयाची घोषणा होताच फटाके फोडून जोरदार नारेबाजी करण्याची आणि मिरवणूक काढण्याची आपल्याकडे अलिखित प्रथाच आहे. मात्र विजयाच्या उत्साहात कोणताची अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.
पुणे महापालिकेत 162 पैकी 98 जागा मिळवत भाजपने निर्विवाद सत्ता स्थापन केली आहे. राष्ट्रवादीला 40, काँग्रेसला 11 तर शिवसेनेला 10 जागा मिळाल्या आहेत.