पुणे : पुणे लोणावळ्यातील प्रसिद्ध शिवाजी आयएनएस केंद्राची (Pune Crime News) ड्रोनने (Drone)  रेकी करणाऱ्या हैदराबादच्या तीन जणांवर लोणावळा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयएनएस शिवाजी या ठिकाणी विदेशातील सैन्यासह देशभरातील नौदलाचे तंत्रज्ञान विकसित करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. हैदराबादच्या तिन्ही आरोपीला शिवाजी आयएनएसमधील अधिकाऱ्यांनी संशयस्पद रित्या ड्रोन शूटिंग करत असताना पकडून लोणावळा शहर पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. बालकृष्ण मुन्था,के.दिनेश आनंद आणि तनिस तिलक तेजा, अशी तिघांची नावं आहेत. नौदलाच्या विविध जहाज बोट यासह अनेक महत्त्वाच्या प्रशिक्षणामध्ये शिवाजी आयएनएसचा मोठा वाटा आहे. हे तिघे गुप्तरित्या या ठिकाणचे चित्रीकरण करत असताना पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. 


पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी दोन दहशतवाद्यांना पकडण्यात आले होते. या दोघाही दहशतवाद्याकडे ड्रोनचे साहित्य आढळल्यानंतर यांनी ड्रोनच्या साहय्याने जंगलांची रेकी करून त्या ठिकाणी बॉम्बस्फोटाच्या चाचण्याही घेतल्या होत्या. हैदराबादचे हे तिघेही जण संशयस्पदरीत्या शिवाजी आयएनएस परिसरात ड्रोन उडवून शूटिंग करताना आढळून आल्याने सध्या खळबळ उडाली आहे. या तिघांची सध्या लोणावळा शहर पोलीस चौकशी करत असून हैदराबाद येथून पुण्यात फिरायला आल्याची माहिती समोर येत आहे. नोटीस देऊन सोडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.


दहशतवाद्यांकडे ड्रोनचं साहित्य


काही दिवसांपूर्वी पुण्यात दोन दहशतवादी सापडले होते. कोथरुडसारख्या परिसरात चोरीच्या गुन्ह्यात पकडलेल्या दोघांचा संपर्क ISIS सारख्या देशविरोधी संघटनांशी संपर्क असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर त्यांच्या घराची झडती घेतली असता बंदूक आणि स्फोटकं आढळली होती. त्यानंतर बॉम्ब बनवण्याचं साहित्य आणि कृती लिहिलेली चिठ्ठीदेखील सापडली होती. पुण्यातील कोंढवा परिसरात हे दोघं राहत होते. त्यानंतर पुण्यातील कोंढवा परिसरातूनच एका भूलतज्ञ असणाऱ्या डॉक्टरला ISIS मध्ये भरती करुन घेतो या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्याच्याकडे ड्रोनचं साहित्यदेखील सापडलं होतं. त्यामुळे पुण्यात चांगलीच खळबळ उडाली होती. 


एअरफोर्स परिसरात ड्रोन उडवणाऱ्यावर कारवाई


काही दिवसांपूर्वी  लोणावळा (lonavala) एअरफोर्स परिसरात विना (Pune crime) परवाना ड्रोन उडवल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. लोणावळा शहर पोलीस ठाण्यात कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हवाई दलाचे पोलीस अधिकारी मोहम्मद यांनी तक्रार दिली होती. अर्शद आलम असं या तक्रार दिलेल्या अधिकाऱ्याचं नाव होतं. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.  राहुल बालकृष्ण बडोले असं ड्रोन उडवणाऱ्या तरुणाचं नाव होतं. 


इतर महत्वाची बातमी-


Pune Ganeshotsav 2023 : पुणे विसर्जन मिरवणूकीचा गोंधळ कायम, मंडळांचा क्रम सांगण्यास पोलिसांचा नकार; बंद रस्ते, पर्यायी रस्ते अन् संपूर्ण विसर्जनाचं नियोजन एका क्लिकवर...