कदम यांच्या कार्यकर्त्यांकडून फेसबुकवर टाकण्यात येणाऱ्या पोस्ट तसेच कमेंट्सविषयी मोरे यांनी जाब विचारला आणि त्यातून हा वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे. कदम हेदेखील पूर्वी मनसेमध्ये होते. मात्र, महापालिका निवडणुकीपूर्वी ते भाजपमध्ये गेले आणि त्यांच्या पत्नी नगरसेविका म्हणून निवडून आल्या.
दोन पक्षांच्या नेत्यांमध्ये झालेल्या या भांडणाप्रकरणी बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय वैमनस्यातून हा मारहाणीचा प्रकार घडल्याचं म्हटलं जात आहे.
पाहा व्हिडीओ :