पुणे : आठ महिन्यांच्या मुलीसह बाप मुठा नदीत वाहून गेल्याची घटना घडली. सुनील विजय दणाने आणि त्यांची 8 महिन्यांची मुलगी खडकवासला धरणातून मुठा नदीच्या पात्रात सोडण्यात आलेल्या पाण्यात वाहून गेले. आज (24 जुलै) संध्याकाळी साडे सहा - सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
सुनील आणि त्यांची पत्नी बाळाला घेऊन धरणाच्या समोर असलेल्या पुलावर उभे होते. सुनील यांनी बाळासह पुलावरून पाण्यात उडी मारली, अशी माहिती सुनील यांच्या पत्नीने पोलिसांना दिली.
सुनील दणाने हे खडकवासला गावात राहणारा असून खडकवासला ग्रामपंचायतीमधे शिपाई म्हणून काम करत होते.
अग्निशमन दल आणि पोलिसांनी दोघांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधारामुळे शोध घेणं शक्य झालं नाही.
आठ महिन्यांच्या लेकीसह बाप मुठा नदीत वाहून गेला!
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे
Updated at:
24 Jul 2017 10:46 PM (IST)
आठ महिन्यांच्या मुलीसह बाप मुठा नदीत वाहून गेल्याची घटना घडली. सुनील विजय दणाने आणि त्यांची 8 महिन्यांची मुलगी खडकवासला धरणातून मुठा नदीच्या पात्रात सोडण्यात आलेल्या पाण्यात वाहून गेले. आज (24 जुलै) संध्याकाळी साडे सहा - सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -