पुणे: भीमा नदीतील जलपर्णीत अडकल्याने पाण्यात बुडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यातील शिरुरच्या वडगाव रासाई गावात ही धक्कादायक घटना घडली.


मल्हारी शेलार असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. ते भीमा नदीवर वीजपंप चालू करण्यासाठी गेले असताना जलपर्णीत अडकल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. या परिसरात जलपर्णीचं मोठं आवरण असल्याने अद्याप त्यांचा मृतदेह हाती लागलेला नाही.

पुणे शहरातून येणारं सांडपाणी मुळा-मुठा नदीत मिसळतं आणि हेच पाणी पुढे भीमा नदीत जमा होतं. त्यामुळे जिल्ह्याच्या पूर्व भागात नदीवर जलपर्णीचे मोठे आवरण तयार झालं आहे. या भागातील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो.