पुणे : पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाला काही तास शिल्लक असताना पिंपरीमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे पंतप्रधान मोदी काही तासांमध्ये पुण्यात दाखल होणार आहेत. विश्वनाथ साळुंखे या व्यक्तीच्या घरात ही स्फोटकं सापडली आहेत.


काल एका महिलेला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देणारा कॉल चिंचवड पोलिसांना आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. तसंच बॉम्बशोधक पथकाच्या ब्रिगेडिअर्सनी विश्वनाथ साळुंखेच्या घराची झडती घेतली. यात पोलिसांना कमी तिव्रतेची स्फोटकं आढळली आहेत. पोलिसांना आधी कॉल केलेला व्यक्ती मनोरुग्ण वाटला होता. मात्र स्फोटकं सापडल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत पुण्यातील सुरक्षाव्यवस्थेत मोठी वाढ केली आहे.

विश्वनाथला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याची चौकशी सुरु असून त्यानं ही स्फोटकं कुठून, कशी आणि कशासाठी आणली याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी विश्वनाथवर एक्स्पोसिव्ह अक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.