पिंपरीत इमारतीवरुन उडी मारुन इंजिनिअर महिलेची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 09 Feb 2018 08:37 PM (IST)
मुलाला सासूकडे सोडून शेजारील इमारतीवरुन उडी घेत, त्यांनी जीवनयात्रा संपवली.
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचं सत्र थांबायचं नाव घेईना. आज आयटी अभियंता महिलेनेच अकराव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. वाकडच्या पार्क स्ट्रीट सोसायटीत ही घटना सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. या महिलेचं पल्लवी मुजुमदार असं नाव आहे. तिचे पती देखील आयटी कंपनीत कामाला आहेत. आज दुपारी त्यांच्या सहा वर्षाच्या मुलाला त्या रुग्णालयात घेऊन गेल्या होत्या. मुलाला सासूकडे सोडून शेजारील इमारतीवरुन उडी घेत, त्यांनी जीवनयात्रा संपवली. दरम्यान, पल्लवी मुजुमदार यांच्या आत्महत्येचं कारण मात्र अस्पष्ट आहे. गेल्या पंधरा दिवसात इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची ही तिसरी घटना आहे.