Baramati News :  इंडियन एअर फोर्सच्या (Indian Air Force) हेलिकॉप्टरमध्ये (Helicopter) बिघाड झाल्याने इमर्जन्सी लँडिंग (Emergency Landing) करण्यात आली. बारामती (Baramati) तालुक्यातील खांडजमध्ये आज (1 डिसेंबर) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास चेतक ZA 425 या हेलिकॉप्टरचे लँडिंग करण्यात आले. या हेलिकॉप्टरमध्ये इंडियन एअर फोर्सचे एक महिला तर तीन एअरफोर्सचे जवान होते. खांडज येथील ज्ञानदेव आटोळे यांच्या शेतामध्ये हेलिकॉप्टर उतरवण्यात आले. पुण्याहून हेलिकॉप्टर सोलापूरकडे जात असताना हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे पायलटने प्रसंगावधान ओळखून हेलिकॉप्टर सुरक्षितरित्या लँड केलं. दरम्यान एअर फोर्सचे आणखी एक हेलिकॉप्टर घटनास्थळी दाखल झाले होते. मदत पुरवून ते हेलिकॉप्टर परतले.