Mumbai - Pune Expressway: मुंबई - पुणे एक्स्प्रेस मार्गावरील अपघात रोखण्यासाठी 'अॅक्शन प्लॅन' आखण्यात आला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तसेच जुना महामार्गावर अपघाताचे प्रमाण कमी करणे व वाहन चालकांमध्ये शिस्त निर्माण होण्याकरीता दीर्घकालीन जनजागृती व अंमलबजावणी करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले होते. त्यानुसार परिवहन विभागाने ‘सुरक्षा’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमासाठी मोटार वाहन विभागातील मुंबई, पुणे, पनवेल, पिंपरी चिंचवड या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांची एकूण 12 पथकांची निर्मिती करण्यात आलेली असून त्या प्रत्येक पथकात 30 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही महामार्गावर यामधील प्रत्येकी 6 पथके व 15 अधिकारी 24 तास कार्यरत राहणार आहेत. मुंबई, पुणे, पिंपरी, पनवेल, पेण परिवहन विभाग गस्त घालणार आहेत. मुंबई - पुणे एक्स्प्रेस मार्गावरील 'ब्लॅक स्पॉट' चे यामार्फत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. आज राज्य परिवहन उपायुक्त अभय देशपांडे यांनी एक्स्प्रेस वेची पाहणी केली.
मुंबई आणि पुणे या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या द्रुतगती महामार्गावरील (Mumbai - Pune Expressway) अपघातांची मालिका सुरूच आहे. यामध्ये, दररोज या मार्गावर अपघातांच्या घटना घडत असून अनेक प्रवासी गंभीर जखमी होऊन मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. यामुळे, या मार्गावरील अपघात रोखण्यासाठी राज्य परिवहन विभागामार्फत 'ऍक्शन- प्लॅन' तयार करण्यात आला आहे. यामध्ये, मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावरील ब्लॅक- स्पॉट आणि धोकादायक भागांची परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत पाहणी करण्यात आली. यावेळी, राज्य परिवहन विभागाचे उपायुक्त अभय देशपांडे हे उपस्थित होते. यावेळी, अपघात रोखण्यासाठी महामार्गावरील आवश्यक ठिकाणी रिफ्लेक्टर्स, धोकादायक असलेल्या ठिकाणी सूचना फलक, विशेष प्रकाश योजना करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तर, पुढील सहा महिने या मार्गावर गस्ती पथकामार्फत 24 तास गस्त घालण्यात येणार आहे. यामध्ये, मुंबई, पुणे, पिंपरी, पेण, पनवेल येथील परिवहन विभागाचे 12 गस्ती पथक तैनात करणयात येणार असून वाहतुकीच्या नियमांचे भंग करणाऱ्या चांचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, आज महाराष्ट्र राज्य परिवहन उपायुक्त अभय देशपांडे यांच्या समवेत पेण, पनवेल, पिंपरी येथील उपप्रादेशिक अधिकारी आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संघटनेचे अध्यक्ष गुरुनाथ साठीलकर यांनी महामार्गाची पाहणी केली. यावेळी, मुंबई -पुणे एक्स्प्रेस महामार्ग आणि जुना मुंबई - पुणे महामार्गावरील धोकादायक 'ब्लॅक - स्पॉट'चे सर्वेक्षण करून अपघातांच्या कारणे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुंबई - पुणे एक्स्प्रेस मार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी 'ऍक्शन - प्लॅन' तयार करण्यात आला आहे. यामध्ये, राज्य परिवहन विभागाचे 12 पथके हे 24 तास गस्त घालून नियमांचा भंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे. एक डिसेंबरपासून पुढील सहा महिने हा 'अॅक्शन -प्लॅन' राबविण्यात येणार असून या पूर्ण महामार्गावर 12 गस्ती पथक तैनात राहणार आहेत.
या मार्गावरील उतारावर अनेक अवजड वाहने ही डिझेल वाचविण्याच्या प्रयत्नात वाहने 'न्यूट्रल' करीत चालवीत असल्याने अपघात झाले असल्याचे दिसून असल्याचे मुंबई - पुणे एक्स्प्रेस मार्गावरील अपघातग्रस्तांच्या मदतीला सामाजिक संघटनेचे अध्यक्ष गुरुनाथ साठीलकर यांनी सांगितले आहे. यामुळे, या मार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रातील धोकादायक बनत असलेल्या बोरघाटातील मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील उतारावर 'सिग्नल' यंत्रणा आणि रस्त्याच्या दुतर्फा व्हर्टिकल -लाईट इंडिकेटर्स बसविल्यास वाहनांचे वेग नियंत्रणात आणून काही प्रमाणात अपघात टाळणे शक्य होईल, अशी शक्यता प्रवासी मनोज ठाकूर यांनी वर्तविली आहे.