पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडजवळच्या भोसरीमध्ये रॅम्बो सर्कसमधील हत्ती पत्र्याच्या शेडमधून सुटल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र हा हत्ती वेळीच पकडल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
भोसरीमध्ये कायमच 'रॅम्बो सर्कस'चे शो होत असतात. मात्र 25 मे 2016 ला प्राण्यांना निर्दयतेची वागणूक देत असल्याचा ठपका ठेवत अॅनिमल वेल्फेअर बोर्डने हे हत्ती ताब्यात घेतले होते.
त्यानंतर 23 जूनला न्यायालयीन लढा जिंकून हे हत्ती पुन्हा सर्कसमध्ये दाखल झाले. दरम्यानच्या काळात सर्कस या भागातून हलवण्यात आली. मात्र हत्तींना तिथेच एका पत्र्याच्या शेडमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यातूनच हा हत्ती सुटला होता.